Think and Grow Rich Summary in Marathi – विचार करा आणि श्रीमंत व्हा

स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये आज आपण पाहणार आहोत | Think and Grow Rich Summary in Marathi – विचार करा आणि श्रीमंत व्हा |

मित्रांनो जगातला प्रत्येक व्यक्ती यशस्वी आणि श्रीमंत होऊ इच्छितो | त्यामुळे तो कायम श्रीमंत होण्याच्या  रहस्याच्या शोधात असतो | जर तुम्हाला देखील श्रीमंत व्हायचे असेल आणि श्रीमंत होण्याच्या रहस्य ला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला Think and Grow Rich Summary in Marathi पासून सुरुवात करायला पाहिजे |

Think and Grow Rich Book, हे आजपर्यंत लिहिलेली जगातील सगळ्यात चांगली Financial पुस्तकांमधली एक आहे | विचार करा आणि श्रीमंत व्हा | नेपोलियन हिल यांच्यामार्फत लिहिली गेलेली Think and Grow Rich Book चे मराठीमध्ये भाषांतर आहे | Think and Grow Rich Summary in Marathi च्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला त्या सगळ्या रहस्येच्या बद्दल स्टेप बाय स्टेप सांगणार आहे | जे ह्या पुस्तकात नेपोलियन हिल यांच्यामार्फत श्रीमंत आणि यशस्वी होण्या साठी सांगितले गेले आहे |

Think and Grow Rich Book सारांश ?

लेखक नेपोलियन हिल
प्रकाशकFingerprint Publishing House 
मूळ भाषा English 
मूळ शिर्षक Think and Grow Rich 
मराठी अनुवाद शिर्षकविचार करा आणि श्रीमंत व्हा
Blog Post Title Think and Grow Rich Summary in Marathi

तर चला मित्रांनो, Think and Grow Rich Summary in Marathi ची सुरुवात करण्या अगोदर या बुक चे लेखक नेपोलियन हिल यांच्या बद्दल जाणून घेऊया |

नेपोलियन हिल कोण आहेत ?

नेपोलियन हिल कोण आहेत ?

नेपोलियन हिल हे अमेरिकेचे एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि त्याचबरोबर ते एक महान Philosopher, विचारक आणि जर्नलिस्ट पण होते | त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1883 ला पाउंड, वर्जीनिया च्या एका छोट्याशा लाकडाच्या घरामध्ये झाला होता | नेपोलियन हिल यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासूनच माउंटेंन  रिपोर्टर नामक न्यूजपेपर साठी आर्टिकल लिहायला सुरू केले होते |

नेपोलियन हिल यांना त्यांच्या नवीन विचारांसाठी ओळखले जाते | त्यांनी जास्तीत जास्त पर्सनैलिटी डेवलपमेंट, सेल्फ-हेल्प आणि Financial च्या संबंधित पुस्तके लिहिली आहे | आणि त्याच पुस्तकांमधील एक म्हणजे Think and Grow Rich Book ने  त्यांना जगामध्ये वेगळीच ओळख दिली | 

Think and Grow Rich तुम्ही का वाचली पाहिजे ?

Think and Grow Rich तुम्ही का वाचली पाहिजे ?

Think and Grow Rich Book 1937 साली प्रकाशित झाली होती | तेव्हापासून ते आजपर्यंत या पुस्तकाची कमीत कमी 2 करोड पेक्षा जास्त कॉपी विकली गेली आहेत | वर्ष 2007 मध्ये अमेरिकेची  Business Week मॅक्झिन ने , या पुस्तकाला जास्त विकणे वाली Paperback Business Book च्या लिस्ट मध्ये 9th Position वर ठेवले | यावरून तुम्ही हा अंदाज लावू शकता की Think and Grow Rich Book तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे |

तर चला मित्रांनो आता मुद्द्याची गोष्ट करूया Think and Grow Rich तुम्ही का वाचली पाहिजे ?

तुम्ही पुस्तकाचे टायटल वाचून विचार करत असणार की ‘’असे काही शक्य असेल’’ ? असा कोणताही व्यक्ती फक्त विचार करून श्रीमंत होऊ शकतो | तुमच्या या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिले गेले आहे |   ज्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत |

हे पुस्तक केवळ Financial Prosperity प्राप्त करण्यासाठीच  सीमित नाही आहे | उलट हे Motivational, Personality  Development आणि Self-Help पुस्तक आहे |

हे पुस्तक प्रत्येक माणसाला सगळ्या कार्य क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते | हे पुस्तक तुमच्या लाईफ मध्ये जे पण  तुम्ही बोलू इच्छिता त्याला पूर्ण करण्यासाठी मदत करेल | Think and Grow Rich Book जगभरातल्या अशा लोकांनी वाचली पाहिजे ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करायचे आहे | जे त्यांच्या व्यक्तित्वचे विकास करू इच्छितात | ज्याला आपले जीवन सुख-समृद्धीने जगायचे आहे.

मित्रांनो आम्ही Think and Grow Rich Book चे सारांश तुमच्यासाठी यामुळे घेऊन आलो आहे | की कारण तुम्ही पण या पुस्तकांमध्ये दिल्या गेलेल्या  यशा  चे रहस्य जाणून तुमच्या लाईफ मध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस आणू शकाल |

Think and Grow Rich Summary in Marathi ?

Think and Grow Rich Summary in Marathi ?

1908 मध्ये या Book चे  लेखक नेपोलियन हिल यांच्या आयुष्यामध्ये एक महत्वपूर्ण टर्निंग पॉईंट आला जेव्हा त्यांनी फेमस उद्योगपती एन्ट्रीव कार्नगी यांचे इंटरव्यू करायचे भाग्य मिळाले | एन्ट्रीव कार्नगी त्यावेळी चे सगळ्यात शक्तिशाली आणि सफल लोकां चा मधले एक होते | एन्ट्रीव कार्नगी यांचे म्हणणे असे होते की यशा च्या मागचे एकच सिम्पल फॉर्मुला असतो | आणि तो  जगातला प्रत्येक माणूस समजू शकतो आणि त्याला मिळउ  पण शकतो |

एन्ट्रीव कार्नगी यांनी यशाच्या या फॉर्मुला ला शोधण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी त्या काळाचे 500 पेक्षा जास्त यशस्वी आणि करोडपती लोकांचे साक्षात्कार करण्याचे लक्ष नेपोलियन हिल यांना दिले | नेपोलियन हिल यांनी या लक्ष ला स्वीकार करून त्याकाळचे यशस्वी लोकांचे रहस्य हुडकायला सुरुवात केली | नेपोलियन हिल यांनी थॉमस एडिसन, अलेक्झडर ग्राहम बेल, हेनरी फोर्ड आणि थियोडोर  रुजवेल्ड यांच्यासारखे त्याकाळचे 500 पेक्षा जास्त सगळ्यात यशस्वी आणि श्रीमंत लोकांचे साक्षात्कार घेतले |

वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्त केलेल्या 500 पेक्षा जास्त यशस्वी लोकांचे इंटरव्यू घेतल्यानंतर नेपोलियन हिल यांना कळाले की यशस्वी लोकांमध्ये काही कॉमन हॅबिट्स असतात ज्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये मान सन्मान, पैसा आणि सुख शांती याची कमी नसते | 

श्रीमंत होण्यासाठी किंवा  यश प्राप्तीसाठी कोणतेही व्यक्तीला शिक्षण घेणे हे आवश्यक नाही | जास्त आवश्यक हे आहे की ज्या सवयींना ओळखणे | जे श्रीमंत आणि यशस्वी लोकांमध्ये बघितले जातात |

Think and Grow Rich Book मध्ये नेपोलियन हिल यांनी श्रीमंत होण्यासाठी 13 Steps सांगितले आहेत ज्यांना फॉलो करून कोणताही व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्ती करू शकतो | आज या आर्टिकल Think and Grow Rich Summary in Marathi मध्ये आम्ही तुम्हाला नेपोलियन हिल यांच्यामार्फत सांगितले गेलेल्या श्रीमंत आणि  यशस्वी बनण्याचे 13 स्टेप्स एक एक करून  तुम्हाला सांगणार आहे | 

श्रीमंत होण्याचे 13 Steps ?

  1. Desire (इच्छा)
  2. Faith (विश्वास)
  3. Auto Suggestion (स्वत: ची सूचना)
  4. Specialized Knowledge (विशेष ज्ञान)
  5. Imagination (कल्पना करणे )
  6. OrganizedPlanning
  7. Decision (निर्णय)
  8. Persistence (चिकाटी)
  9. Power of Mastermind
  10. Sex Transmutation (लिंग परिवर्तन) 
  11. Subconscious Mind (अवचेतन मन)
  12. The Brain
  13. Sixth Sense

तर चला मित्रांनो श्रीमंत होण्यासाठी  सगळ्या Steps ला एक एक करून चांगल्या प्रकारे पाहूया… 

Step.1 = Desire (इच्छा) ?

मित्रांनो जर तुम्ही पैसे कमउ इच्छिता | तर तुमच्या आत मध्ये पैसे कमावण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे | असं नाही की हा नियम फक्त पैसे कमावण्यासाठी लागू होतो | हा नियम जगभरातल्या प्रत्येक कामासाठी लागू होतो | ज्याचा तुम्ही विचार करता ते तुम्ही करूही शकता | पुस्तक लेखकाने पुस्तकांमध्ये सहा स्टेप्स सांगितले आहे | ज्यापासून तुम्ही पैसे कमावण्याच्या इच्छे ला पूर्ण करू शकता |

  1. तुम्ही किती पैसे कमवून इच्छिता | याचा तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार करा, फक्त तुम्हाला हे म्हणायचे आहे की मी खूप पैसे कमवणार | तुम्हाला एक निश्चित धनराशी ही विचार करायला लागणार | जसे की मी 1  लाख रुपये प्रत्येक महिन्याला कमावणार |
  2. आता तुम्हाला हे निश्चित करायला लागणार की 1 लाख रुपये प्रत्येक महिन्याला कमावण्यासाठी तुम्ही काय काय काम करू शकता ? जसे की तुम्ही माझ्यासारखे लॉगिन करू शकता | नाहीतर यूट्यूब चैनल उघडून पण पैसे  कमवू शकता | म्हणण्याचा उद्देश फक्त हा आहे की तुम्ही तुमच्या मनपसंधीने कोणतेही काम करू शकता  ज्यापासून तुम्ही महिन्याला 1लाख रुपये कमवू शकल |
  3. याच्यानंतर तुम्हाला एक ठराविक तारीख ठरवावी लागेल ज्या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे इच्छित (जेवढे तुम्ही ठरवलेले  तेवढे) पैसे कमवू शकाल | जसे की मी दिनांक 30/12/2026 पर्यंत 1  लाख रुपये प्रत्येक महिन्याला कमवायला सुरुवात करणार |
  4. याच्यानंतर तुम्ही इच्छुत  पैसे कमवण्यासाठी ज्या कामाला सुरुवात करणार आहे ते पूर्ण करण्यासाठी एक निश्चित योजना बनवा आणि त्याच्यानंतर वेळ वाया न घालवता त्या कामाला सुरुवात करा |
  5. तुम्ही किती पैसे कमवून इच्छिता ? तुम्ही इच्छित पैसे कमवण्यासाठी काय काम कराल |  तुम्ही किती तारखेपर्यंत इच्छित पैसे कमवाल | ते काम पूर्ण करण्यासाठी तुमचे काय योजना आहे | या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे एका कागदावर लिहून एक स्टेटमेंट तयार करून घ्या |
  6. त्याच्यानंतर तुम्ही जे लिहिलेले स्टेटमेंट आहे. ते दिवसातून दोनदा वाचा आणि त्याला सारखे आठवत राहा |

Step.2 = Faith (विश्वास)

कोणत्याही गोष्टींचे विचार करणे आणि त्याला  मिळवायचे याच्यामध्ये खूप अंतर आहे | तुम्ही कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत मिळू शकत नाही तोपर्यंत, तुम्हाला विश्वास पटत नाही की तुम्ही ते मिळवू शकता |

जर तुम्ही श्रीमंत बनू इच्छिता, तर सगळ्यात पहिला तुम्हाला तुमच्यावर विश्वास  ठेवावा लागेल | की हा मी श्रीमंत बोलू शकेल | तुम्ही ज्या प्रकारच्या विचाराला तुमच्या सबकॉन्शुअन्स माइंड मध्ये घालता | तुमचे सबकॉन्शुअन्स माइंड त्याच प्रकारे काम करायला सुरुवात करते | त्यामुळे तुम्हाला कायम पॉझिटिव्हच  विचार करायला पाहिजे | आणि निगेटिव्ह विचारांपासून दूर राहिले पाहिजे |

Step.3 = Auto Suggestion (स्वत: ची सूचना)

कोणताही व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवायला शिकू शकतो | जर तुम्ही तुमच्याबद्दल कोणत्याही कामाच्या विषयी रोजच्या रोज हे म्हणाल की मी हे काम करू शकतो तर एक काळ असा येईल की तुम्ही ते काम करण्यासाठी खरंच सक्षम होचाल | स्वतःला याच प्रकारे बोलण्यालाच ऑटो सजेशन म्हणतात |

आपले अवचेतन मन पूर्ण  विश्वासाच्या भावनेने दिले गेलेल्य कोणत्याही आदेशाला ग्रहण करते आणि त्या आदेशा वर ॲक्शन करायला सुरुवात करते | ऑटो सजेशन चे सिद्धांत स्वेच्छा पासून  सबकॉन्शियन्स माइंड पर्यंत पोहोचवते | कोणताही विचार असू दे सकारात्मक किंवा नकारात्मक आत्म सुजावाच्या सिद्धांत च्या मदती नुसार, अवचेतन मन मध्ये प्रवेश करू शकत नाही |

Step.4 = Specialized Knowledge (विशेष ज्ञान)

प्रत्येक अडचणीचे समाधान ज्ञान असते | जर तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ इच्छिता |तर तुम्हाला तुमच्या ज्ञानाला सारखे वाढवत राहावे लागेल | सक्सेसफुल मानसे  त्यांच्या व्यवसायाच्या संबंधित ज्ञान प्राप्त करण्यासाठी केव्हाही थांबत नाहीत |

 ज्ञान वाढवण्याचे उद्देश असा नाही की तुम्ही पूर्ण जगातल्या वस्तूंचा विचार करावा | सगळ्यात पहिला तुम्हाला हे ठरवावे लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ज्ञानाची विशेष आवश्यकता आहे |

यात किती मध्ये तुम्हाला तुमच्याच्या Gole च्या अनुसरून म्हणजे तुम्ही जे  काम करणार आहे त्या कामाबद्दल सर्व काही माहिती प्राप्त करावी लागेल | आता तुम्ही विचार करत असाल की ही सगळी माहिती कुठून मिळेल | त्याच्यासाठी तुम्ही ज्या प्रकारची काम करणार आहे त्या विषयाच्या संबंधित चांगली पुस्तके वाचू शकता | नाहीतर त्या फील्ड मध्ये सक्सेसफुल झालेल्या व्यक्तींचे सेमिनार अटेंड करू शकता |

काही लोक या हीन  भावनेने ग्रस्त असतात की त्यांची शालेय शिक्षा अपुरी राहिलेली आहे | मी अशा लोकांना आठवण करून देतो, की थॉमस एडिसन त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये फक्त तीन महिने शाळेमध्ये गेली होते | पण असे खरोखरच नाही की त्यांच्याकडे शिक्षणाची कमी होती | ज्ञान प्राप्त करणे म्हणजे असे नाही की तुम्ही शाळेत किंवा कॉलेज मध्ये  जाऊनच ज्ञान प्राप्ती करू शकता |

Step.5 = Imagination (कल्पना करणे)

माणूस ज्या गोष्टीची कल्पना करू शकतो, त्याला बनऊ पण शकतो | कल्पना ही एक कार्यशाळा आहे जे माणसामार्फत बनविले गेले आहे प्रत्येक योजने ला आकार दिले जाते | कल्पनाही दोन प्रकारे असते 1] सिंथेटिक कल्पना 2] क्रिएटिव्ह कल्पना 

  • सिंथेटिक इमॅजिनेशन – अशा प्रकारच्या कल्पनेमध्ये तुम्ही जुन्या संकल्पना, कल्पना किंवा योजना नवीन नवीन संयोजनात मांडू शकता |
  • क्रिएटिव इमॅजिनेशन – ह्या अशा प्रकारच्या कल्पनेमध्ये तुम्ही अशा प्रकारे विचार करतात की, ज्याच्याबद्दल तुमच्या व्यतिरिक्त कोणी दुसऱ्याने विचार केला नसेल म्हणजे तुम्ही काही अशा प्रकारे होण्याचे विचार करत आहे | जे आत्तापर्यंत कोणीच बनवले नसेल | या स्थितीमध्ये तुम्ही झिरो पासून सुरुवात करता, कारण की तुमचे आयडिया खूप नवीन आहे |

जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवणार असाल | तर तुम्हाला कायम क्रिएटिव्ह इमॅजिनेशन वर फोकस करायला लागणार | तुम्हाला नवनवीन आयडिया बद्दल  विचार करावे लागतील |

Step.6 = Organized Planning

तुम्ही कोणतेही काम करणारा आहात, तर तुम्ही जे काम करणार आहात त्याची प्लॅनिंग तुम्ही पहिल्यापासूनच केली पाहिजे | समजा की तुम्ही ब्लॉगिंग करणार आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण प्लॅनिंग करावी लागेल जसे की |

  • तुम्हाला बघावे लागेल की तुमची वेबसाईट तुम्ही स्वतः बनवणार की वेबसाईट डेव्हलपर ला देऊन बनवणार |
  • तुम्ही तुमच्या वेबसाईट साठी आर्टिकल स्वतः लिहिणार की दुसऱ्या कंटेंट रायटर ला देणार |
  • तुम्ही तुमच्या वेबसाईटचे SEO स्वतः करणार की दुसऱ्याला देणार |
  • तुम्हाला बघावे लागेल की तुम्ही तुमच्या वेबसाईट पासून पैसे किती प्रकारे कमवू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारावर जास्त फोकस करावे लागेल |
  • तुम्ही तुमच्या वेबसाईटवर एका महिन्यात किती आर्टिकल पोस्ट करणार |

बिना प्लॅनिंग चे तुम्ही कोणत्याही कामात सक्सेसफुल होऊ शकत नाही | तुमच्या असफल होण्यामागचे कारण हे असते की तुम्ही कोणत्याही गोष्टीचे प्लॅनिंग करत नाही | 

थॉमस एडिसन पण लाईटीचे बल बनवण्याआधी 10 हजार वेळा असफल झाली होते | असफलता कायम राहत नाही | त्याला तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून सफलता मध्ये बदलू शकता |

Step.7 = Decision (निर्णय)

यशस्वी लोकांची एक खास सवय असते ते कोणताही निर्णय वेळ वाया न घालवता घेतात | आणि ते  त्यांच्या निर्णयावर अविचल राहतात | जर तुम्ही देघील सक्सेसफुल होउ इच्छिता, तर तुमच्या मध्ये लवकर डिसिजन घ्यायची क्षमता असली पाहिजे |

जर तुम्ही लवकर डिसिजन घेण्याची योग्यता साध्य करणार असाल, तर तुमचे डोळे आणि कान उघडी ठेवा आणि तोंड बंद ठेवा |

ज्यादा तर लोकांमध्ये टाळाटाळ करण्याची सवय असते | त्यामुळे ते त्यांचे कोणतेही काम योग्य वेळेत करू शकत नाहीत |

जर तुम्ही जगाला दाखवून देणार, असाल की तुमचे काय करण्याचे इरादे आहे ? तर पहिला त्या कामाला पूर्ण करून दाखवा |

Step.8 = Persistence (चिकाटी)

चिकाटीची कमी ही अपयशाचे प्रमुख कारण आहे | जे ज्यादा तर लोकांमध्ये कॉमन प्रॉब्लेम असते | पण याला लांब केले जाऊ शकते | चिकाटीची कमी वर विजय मिळवणे हे पूर्णपणे व्यक्तीच्या इच्छाच्या तीव्रतेवर निर्भर करते | 

जर तुमच्यामध्ये तुमच्या स्वप्नांना मिळवायचे जिद्द नाही आहे | तर तुम्ही तुमच्या स्वप्नांना केव्हाच मिळउ शकत नाही |

चिकाटीचा मुख्य आधार इच्छेची शक्ती आहे आणि इच्छा देखील सर्व यशांचा प्रारंभ बिंदू आहे |

इच्छाशक्ती आणि इच्छा हे जेव्हा दोन्ही  ही  एकमेकांना मिळते | तेव्हा इतकी मजबूत जोडी बनते ज्याला सहजासहजी तोडू जाऊ  शकत नाही | 

ज्यादा तर लोक त्यांच्या गोल ला  जरा अपयश आल्यावर सोडून देतात | असे खूप  कमी लोक असतात जे त्यांच्या लक्ष ला मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात | भले ही  त्यांना कितीही अपयशाची पायरी चढावी लागेल |

जे लोके हरून सुद्धा स्वतःला उभे करतात आणि सतत प्रयत्न करत राहतात असेच लोक यश प्राप्ती करतात |

खूप सारे  लोक आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांना इतके वर्चस्व गाजवू देतात | की ते स्वतःच्या इच्छेनुसार जगणे विसरतात आणि त्यांच्यानुसार आपले आयुष्य जगू लागतात |

अशा लोकांना कायम एकच भीती असते की माणसे काय म्हणतील ? माणसे काय म्हणतील याच्या भीतीने खूप सारे लोक कोणतेही नवीन  कामाला सुरुवात करण्यास भितात  | अशा गोष्टींमध्ये टिक्केच्या भीतीमुळे चप्पल तिची इच्छा मजबूत होते जे तुमच्यासाठी चांगली नाही |

तुमच्यापेक्षा चांगले तुम्हाला कोणीही जाणत नाही | तुम्हाला काय करायला पाहिजे ? तुम्ही काय करणार | याचे उत्तर तुमच्या पेक्षा चांगले  कोणीही देऊ शकत नाही |

हे जग रायचंद  पासून भरले गेले आहे,  जे तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला राय देईल | पण जर तुम्ही यशस्वी होऊ इच्छिता, तर तुमच्या आयुष्यातील निर्णय हे तुम्हाला घ्यावे लागतील |

आज मी तुम्हाला असे चार टिप्स सांगणार आहे, की जे तुमच्या मध्ये कोणतेही काम करण्याचे उत्कटता निर्माण करेल | यासाठी तुम्हाला कोणतेही विशेष  शिक्षणाची आवश्यकता लागणार नाही | उलट थोड्या वेळेने  आणि प्रयत्नाने तुम्ही असे करू शकता |

  1. तुमच्या पशी एक असे गोल असले पाहिजे की ज्याला मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये एक खोल वर  इच्छा असेल | 
  2. तुमच्याकडे एक असे ॲक्शन प्लॅन असले पाहिजे की ज्यावर तुम्ही निरंतर काम करू शकाल |
  3. तुम्हाला तुमच्या माईंडमध्ये नकारात्मक गोष्टींना प्रवेश नाही दिली पाहिजे | असे नकारात्मक गोष्टी कायम तुम्हाला  दोस्ती मध्ये नातेवाईकांमध्ये दिल्या गेल्या जातात |
  4. तुम्हाला एक नाहीतर एकापेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या संघट दोस्ताना व्यवहार ठेवायचा आहे जो तुमची योजना आणि उद्देश यांचे पालन करण्याने तुम्हाला प्रोत्साहित करतील |

Step.9 = Power of Mastermind

तुम्ही भलेही कोणत्याही फिल्डमध्ये काम करत असाल तरीही तुमच्याकडे एक मास्टर माइंड ग्रुप असणे हे खूप गरजेचे आहे | मास्टरमाईंड ग्रुप हे एक अशा ग्रुपचे समूह असते जे तुमचे नॉलेज कायम वाढते |

जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काही मोठे करणार असाल, तर तुम्ही एकटे सर्व काही करू शकत नाही | कारण की होऊ शकते की तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचे नॉलेज नसेल |

प्रत्येक व्यक्ती ही कोणत्यातरी गोष्टींमध्ये एक्सपर्ट असते | त्यामुळे तुम्हाला तुमच्या फिल्ड मधल्या रिलेटेड एक्सपर्ट लोकांला बोलणे चालणे वाढवावे लागेल | हेच एक्सपर्ट लोक तुमच्या योजनेला यशस्वी होण्यासाठी मदत करतील |

तुम्ही अशाच एक्सपोर्ट लोकांना तुमच्या मास्टरमाईंड ग्रुपमध्ये शामिल करून घेऊ शकाल | आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वार्थी बनाल |

तुम्हाला पण त्यांच्या फायद्याचे ध्यान ठेवायला लागणार कारण की, बिना फायद्याचे कोणताही माणूस तुमच्या सोबत जास्त दिवस नाही टिकू शकत |

Step.10 = Sex Transmutation (लिंग परिवर्तन)

एका घटकाचे किंवा उर्जेचे दुसऱ्या रूपात रूपांतर करणे याला ट्रान्सम्युटेशन असे म्हणतात | सेक्सची इच्छा ही सर्वात शक्तिशाली मानवी इच्छांपैकी एक आहे |

संभोगाची इच्छा इतकी प्रबळ आणि रोमांचक असते | की ती मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती आपला जीव आणि सन्मान पणाला लावते |

वैज्ञानिक संशोधनाने काही महत्त्वाची तथ्ये उघड केली आहेत की, जे मानव महान यश मिळवतात ते अत्यंत विकसित लैंगिक स्वभावाचे मानव आहेत. हे असे लोक आहेत ज्यांना लिंग परिवर्तनाची कला समजते |

Step.11 = Subconscious Mind (अवचेतन मन)

आपल्या माईंड मधील दोन विभाग असतात | एक असते Conscious Mind (चेतक मन) आणि दुसरं म्हणजे Subconscious Mind (अवचित मन)

Conscious Mind ते काम असते विचार करने आणि Subconscious Mind चे काम असते तुमच्या विचारावर विश्वास ठेवणे |

सबकॉन्शियस माईंडवर आपले कंट्रोल नसते, पण आपली सर्व विचार,भावनां,विचार आणि निर्णय हेच कंट्रोल करत असते | तुम्ही तसे विचार करता किंवा कार्यकर्ता, Subconscious Mind हे त्याच्यावर विश्वास ठेवते |

चला याला एका उदाहरणच्या स्वरूपात समजून घेऊया – जेव्हा तुम्ही कॅम्पुटर च्या कीबोर्ड वर टाईप करता तेव्हा तुम्हाला काही दिवस विचार करावा लागतो | की कोणता अल्फाबेट नाही तर नंबर कुठे आहे या स्थितीमध्ये विचार करण्याचे काम तुमचे Conscious Mind करते |

पण काही दिवसानंतर तुम्ही टायपिंग करायला शिकतात, तेव्हा तुमच्या हाताची बोटे डोळ्यांनी न  बघता देखील बरोबर बटना पर्यंत पोहोचू लागते | आणि तुम्ही बरोबर टाईप करायला लागतात |

असे तुमच्या Subconscious Mind मुळे होते कारण की जेव्हा तुमचे Subconscious Mind ने  विश्वास केलेला आहे | आणि ज्या गोष्टीवर Subconscious Mind चे विश्वास होते त्याच्याबद्दल Conscious Mind ला पुन्हा विचार करण्याची गरज लागत नाही |

त्यामुळे तुम्हाला कायम पॉझिटिव्ह गोष्टी वरच विचार करावा लागेल | हे पॉझिटिव्ह विचारा हळूहळू तुमच्या Subconscious Mind मध्ये जाऊन बसेल आणि याच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये जी होणार ते पॉझिटिवच होणार |

वरील सात सकारात्मक भावनांव्यतिरिक्त, पुस्तक लेखकाने सात प्रमुख नकारात्मक भावनांबद्दल देखील सांगितले आहे, ज्या आपण आपल्या आयुष्यात टाळल्या पाहिजेत. जसे की भय, मत्सर, द्वेष, सूड, लोभ, अंधश्रद्धा, क्रोध |

Step.12 = The Brain 

तुम्हाला माहिती आहे मेंदू हा जगभरातील सगळ्यात पावरफुल मशीन आहे | आणि आनंदाची बातमी ही आहे की पावरफुल मशीन दुनिया मध्ये फक्त माणसालाच  दिली गेली आहे | त्यामुळे तुम्हाला याचा पूर्णपणे फायदा उचलला पाहिजे.

आपले Brain हे दोन प्रकारे काम करते | ते प्रसारित पण  करते  तसेच कल्पना प्राप्त पण करते | एका चांगल्या विचाराचे आपल्या सफलतीमध्ये एक खूप मोठे योगदान असते |

Step.13 = Sixth Sense

Sixth Sense च्या पावर चा काही मोजकेच लोक चांगल्या प्रकारे वापर करून घेतात, कारण की खूप सारे लोकांना याच्याबद्दल माहितीच  नसते | तर चला समजून घेण्याचा प्रयत्न करूया की Sixth Sense म्हणजेच सहावी इंद्रिय याचा अर्थ काय ?

उदाहरणार्थ – तुम्हाला माहितीच असेल की आय.पी.एल मॅच मध्ये खेळाडूंची बोली लावली जाते | खेळाडूंना विकत घेणारे लोक आपल्या Sixth Sense use  करून खेळाडूंना विकत घेतात |

कारण की त्यांना वाटते की ज्या खेळाडूला त्यांनी विकत घेतले आहे तू चांगला परफॉर्मन्स करणार | आता असे होऊ पण शकते की तो खेळाडू चांगला परफॉर्मन्स करेल, आणि असे पण होऊ शकते की तो खेळाडू चांगला परफॉर्मन्स करू शकणार नाही |

Sixth Sense अशीच एक गोष्ट असते, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू आणि उतरवू शकता | Sixth Sense ही एक अशी क्षमता आहे, जसे या पुस्तकामध्ये दिल्या गेलेल्या सिद्धांताचे प्रयोग करून हळूहळू विकसित करू जाऊ शकतात  |

FAQs : 

1] Think and Grow Rich Book चे लेखक कोण आहेत |

उत्तर: Think and Grow Rich Book चे लेखक नेपोलियन हिल आहेत |

2] Think and Grow Rich Book किती सली  प्रकाशित झाली |

उत्तर: Think and Grow Rich Book 1937 साली प्रकाशित झाली |

3] Think and Grow Rich Book चे  किती कॉपीज विकल्या गेल्या आहेत |

उत्तर: Think and Grow Rich Book चे 2 करोड़ पेक्षा जास्त कॉपीज़ विकल्या गेल्या आहे |

ही पोस्ट तुम्हाला आवडू शकेल.. 

Rich Dad Poor Dad Book summary..

निष्कर्ष : 

नेपोलियन हिल यांच्या Think and Grow Rich Book मध्ये पैसे कमवण्याचे रहस्यचा उल्लेख केला गेला आहे | Think and Grow Rich Summary in Marathi वाचल्यानंतर तुम्हाला ही  बुक खरोखर वाचली पाहिजे |

कारण की या Book ची Summary  पुस्तकाचा एक छोटासा हिसा आहे | जर तुम्ही हे पुस्तक वाचले तर तुम्ही या पुस्तकामध्ये दिले गेलेल्या  यशस्वी आणि पैसे कमवायच्या रहस्य बदल जाणून घेताल | 

मित्रांनो आमचे हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून सांगा | त्याचबरोबर ही गोष्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना आपण शेअर करायला विसरू नका | 

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

Leave a comment