Electric House वायरिंग करून पैसे कसे Kamvaiche ? 2024

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये | आज आपण पाहणार आहोत Electric House वायरिंग करून पैसे कसे Kamvaiche ?

मित्रांनो आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपण जर आपले घर बांधले  तर  घरातील हाऊस वायरिंग किती महत्त्वाचे असते | आपले घरातील काम 80 ते 90 टक्के सर्वकाही लाईटीवरच असते | जसे की घरातील A.C, Fan, कुलर , मिक्सर, फ्रिज असे बरेच काही आपल्या घरात लाईटीवर चालतात | लाईटीचे महत्त्व आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे | हेच लक्षात घेता आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करून पैसे कसे कमवायचे ? याच्याबद्दल तुम्हाला पुरेपूर माहिती देणार आहोत | त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत वाचा |

House Wiring अनुभव ?

Electric House वायरिंग करून पैसे कसे Kamvaiche ?

मित्रांनो तुम्ही इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करण्या अगोदर | तुम्हाला कमीत कमी तीन ते चार वर्षाचा इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग Fild मध्ये अनुभव असणे गरजेचे आहे | आणि याच्यासाठी तुमचा दोन वर्षाचा इलेक्ट्रिक आय.टी.आय कोर्स पूर्ण होणे गरजेचे आहे कारण तुम्हाला पुढे इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग चे लायसन्स काढणे सोपे जाईल | अनुभव करिता तुम्ही तुमच्या जवळच्या इलेक्ट्रिक वायरमन ची संपर्क करू शकता | 

इलेक्ट्रिक वायरमन कडे कामाला गेल्यावर तुम्हाला House Wiring Fild मध्ये खूप अनुभव येईल | जसे की इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करण्यासाठी  होलसेल दरात इलेक्ट्रिकल मटरेल कुठून आणायचे कस्टमर कसे जोडायचे कस्टमरला विश्वासात घेऊन आपला व्यवसाय कसा वाढवायचा | आणि जर तुम्ही House Wiring चे काम मनापासून व प्रामाणिकपणे केले तर  तुम्हाला लोक ओळखायला लागतील | व तुमच्या कामाची क्वालिटी बघून तुम्हाला त्यांच्या नातेवाईकांचे किंवा शेजारी मित्र-मैत्रिणीचे  काम भेटतील |

तुमचं एकदा House Wiring च्या फिल्टरमध्ये नाव व्हायला लागली की तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक Licence ची गरज लागणार | आणि तुम्ही Licence काढून House Wiring करू शकता | त्यासाठी तुम्हाला House Wiring च्या Fild मध्ये 3 ते 4 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे | 

इलेक्ट्रिक Licence ?

Electric House वायरिंग करून पैसे कसे Kamvaiche ?

मित्रांनो तुम्हाला जर सर्वप्रथम इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करून पैसे कमवायचे असेल तर, तुम्हाला इलेक्ट्रिक Licence ची  गरज लागणार | कारण कोणताही व्यक्ती इलेक्ट्रिक Licence असल्याशिवाय इलेक्ट्रिक हाउस वायरिंग करू शकत नाही | त्यामुळे तुम्हाला हाऊस वायरिंग करण्यासाठी इलेक्ट्रिक Licence हे खूप महत्त्वाचे आहे | तुमच्याकडे जर Licence असेल तर तुम्ही Legally इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करू शकता | 

व इलेक्ट्रिक Licence मिळवण्याचे 3 प्रकार आहे ते प्रकार आपण एक एक करून पाहूया | पहिला प्रकार म्हणजे वायरमेन Licence  दुसरा प्रकार म्हणजे सुपरवायझर Licence  तिसरा प्रकार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर Licence  या तिन्ही प्रकारा मधला आपल्याला  इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करण्यासाठी पहिला प्रकार खूप उपयुक्त आहे त्यामुळे आपण हे तिन्ही प्रकार न पाहता फक्त पहिला प्रकार पाहणार आहोत | आणि तुमचा इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करून पैसे कमवायचे मार्ग सोपा करणार आहोत | आणि तेही इलेक्ट्रिक Licence Legally मिळवून | 

1] वायरमेन I.T.I ?

Electric House वायरिंग करून पैसे कसे Kamvaiche ?

मित्रांनो सर्वप्रथम आपण इलेक्ट्रिक वायरमेनचे काय काय काम असते ते जाणून घेऊया | तर मित्रांनो इलेक्ट्रिक वायरमेन चे काम हे फक्त वायरिंगचेच असते | जसे की House Wiring, Commercial Wiring, Industrial Wiring हे तीन प्रकार आहेत | जर या तिन्ही प्रकारांमध्ये कोणत्याही एका प्रकारांमध्ये जर मेंटेनन्स असेल किंवा वायरिंग चे काम करायचे असेल तर ते सर्व काम इलेक्ट्रिक वायरमेन बघतो | 

तर मित्रांनो आता आपण पाहिले की इलेक्ट्रिक वायरमेन चे काय काय काम असते | तर याच्यापुढे आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रिक वायरमेन होण्यासाठी काय काय प्रोसेस आहे | तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इलेक्ट्रिक वायरमेन व्हायचे असेल तर तुमची 10th पास असणे गरजेचे आहे | त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी किंवा प्रायव्हेट I.T.I ला ऍडमिशन घेऊ शकता | आयटीआयचा Long Form असा आहे Industrial Training Institute |

 I.T.I मध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत | जसे की फिटर, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिशन, ड्रॉप्समन सिविल इत्यादी जर तुम्हाला इलेक्ट्रिक वायरमेन व्हायचे असेल तर तुम्हाला आय.टी.आय इलेक्ट्रिशन चा दोन वर्षाचा कोर्स करावा लागेल | दोन वर्षाचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर अनुभव म्हणून एक वर्ष अप्रेंटिस शिप इलेक्ट्रिकल संदर्भात कोणत्याही कंपनीत किंवा कॉन्ट्रॅक्टर च्या हाताखाली काम करावे  लागेल |

आता आपण पाहिले की इलेक्ट्रिक Licence मिळवण्यासाठी आय.टी.आय मध्ये आपण कोणता ट्रेड निवडायला पाहिजे | व आता आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रिक Licence मिळवण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात |

लागणारे कागदपत्रे :

1] Adhar Card 

2] PAN Card

3] L.C/T.C.-10th/12th

4] I.T.I Certificate

5] I.T.I All Marksheets

6] All Docs self attested

7] 4 & 5 should be attested by PWD

8] All Original with 2 set of Photocopy

9] MH Domicile Certificate

10] Passport Size Photo – 6

11] Form B1, E, C, 12M,

12] Exp. Certificate (Contractor Lic. No & Muster Copy)

13] A4 size Envelop with 45 Rs. Stamp with Self Name & Address.

14] Post Envelop of Rs. 5 – 2 with Self Name & Address.

15] Rs. 400 challan form Gras Website. 

तर मित्रांनो वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही PWD चे ऑफिस असते आपल्या इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर च  तुमच्या जवळच्या जिल्ह्यामधूनच तुम्हाला फॉर्म भरावे लागेल | फॉर्म सबमिट केल्यानंतर  तुमच्या फॉर्ममध्ये जे काही त्रुटि असतील ते सात ते आठ दिवसांमध्ये तुम्ही दुरुस्त करावे लागतात | आणि फॉर्म व्यवस्थित सबमिट केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला इलेक्ट्रिक वायरमेन चे Licence मिळून जाईल |

इलेक्ट्रिक Shop ?

Electric House वायरिंग करून पैसे कसे Kamvaiche ?

मित्रांनो जर तुम्ही इलेक्ट्रिक Licence एकदा काढले की तुम्ही वायरिंग चे कामे घेऊ शकता व करू शकता |

आणि जर तुम्हाला House वायरिंग करून खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिक Shop घालने गरजेचे आहे | कारण की तुम्हाला House वायरिंग करण्यासाठी जे लागणारी मटरेल आहे ते कोणत्याही दुकानात न घेता तुमच्या स्वतःच्या दुकानात  तुन घेऊन तुम्ही ते House  वायरिंग करण्यासाठी वापरू शकता आणि याच्यामध्ये दुसऱ्या दुकानदाराचे कमिशन वाचते व आपल्याला खूप फायदा होतो |

आणि तुम्ही काढलेल्या इलेक्ट्रिक Shop मार्फत दुसऱ्याही वायरमेन ना होलसेल प्रकारे मटरेल दिले की तेही तुमच्याच दुकानातून House वायरिंग साठी लागणारे मटरेल खरेदी करतील व अशा प्रकारे तुम्हाला डबल प्रॉफिट होण्याची शक्यता आहे | व इलेक्ट्रिक Shop चा उपयोग फक्त हाउस वायरिंग साठी नव्हे तर घरातील बारीक सारी गोष्टींसाठीही उपयुक्त आहे जसे की घरातील लागणारे बले,  कोणताही उत्सव किंवा समारंभ असल्यास लागणारे लाइटिंग ची माळा, घरात बारीक सारी गोष्टींना लागणारी वायर, यासाठीही इलेक्ट्रिक Shop चा तुम्हाला उपयोग होऊ शकतो | 

आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर इलेक्ट्रिक Market मधून सामान मोठ्या प्रमाणात तुमच्या इलेक्ट्रिक Shop करिता खरेदी केले तर तुम्हाला खूप कमी कॉस्ट मध्ये इलेक्ट्रिक मटरेल मिळून जाईल | आणि याचा फायदा आपल्याला असा होईल की जर आपण बाकीच्या पेक्षा कमी रेट ने कॉलिटी मटरेल विकायला सुरुवात केली तर ग्राहक आपल्याकडे आकर्षित होतात | त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिक मार्केटमधून आपल्याला जे काही सामान लागेल ते मोठ्या प्रमाणात खरेदी करून होलसेल मध्ये लावण्याचा प्रयत्न करा | आणि आपण इलेक्ट्रिक Shop मार्फत दोन्हीकडून नफा कमवू शकतो | त्यामुळे इलेक्ट्रिक Shop  घालने गरजेचे आहे असे आम्हाला वाटते |

इलेक्ट्रिक Point Ret ?

Electric House वायरिंग करून पैसे कसे Kamvaiche ?

मित्रांनो जर तुम्हाला इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करून पैसे कमवायचे असतील तर | तर तुम्हाला Point Ret माहिती असणे खूप गरजेचे आहे | कारण की तुम्ही जे इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करणार आहे ते सर्व काही पॉईंटवर त्याची किंमत ठरवली गेली जाते | आणि प्रत्येक पॉईंटला किती रेट आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत | पण याच्या आधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जे इलेक्ट्रिक Point Ret ठरवले असते ते तुमच्या ग्राहकासमोर सादर करणे गरजेचे आहे |

SL.NOCATEGORYRETE
1Light Point210 Rs.
2Fan Point200 Rs.
3Two Way Light Point260 Rs.
4Two Way Fan Point265 Rs.
5Bell Point200 Rs .
6Gate Light Point365 Rs.
76 Amps Switch + Socket225 Rs .
816 Amps Switch + Socket270 Rs .
9AC Circuit With Point1,295 Rs.
10Water Heater Circuit With Point1,410 R .
11Lighting Circuit495 Rs.
12Power Circuit585 Rs.
13Inverter Circuit1,790 Rs.
14Single Phase DB with MCB Fixing1,200 Rs.
15Three Phase DB with MCB Fixing1,750 Rs.
16Single Phase Service Line2,000 Rs.
17Three Phase Service Line3,400 Rs.
186 feet Earth Pipe2,000 Rs.
तर मित्रांनो हे आहेत इलेक्ट्रिक  Point Ret या Point Ret नुसार तुम्ही ग्राहकाला चार्जेस लावू शकता | तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ग्राहकाशी बोलून या Point Ret मध्ये काही कमी जास्तही करू शकत

ग्राहक जोडायचे कसे ?

Electric House वायरिंग करून पैसे कसे Kamvaiche ?

मित्रांनो समजा जर आपण इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करायला शिकलो | तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ग्राहक कसे मिळवायचे | ग्राहक मिळवण्याकरिता मित्रांनो तुम्हाला तुमच्या कामात Quality आणावी लागेल | हाऊस वायरिंग मध्ये क्वालिटी म्हणजे आपल्याला लागणारी वायर वेस्टेज न घालवता त्याचा पुरेपूर वापर करावा | आपले हाउस वायरिंग कमी वेळेत  चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे | लागणाऱ्या मटरेल पेक्षा जास्त मटरेल आणून ते वेस्टेज न जाऊ देणे | हे अशा काही गोष्टी तुमच्या कामांमध्ये असतील तर कस्टमर आपल्या आपण  तुमच्याशी जोडले जातात |

मित्रांनो इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग मध्ये कस्टमर जोडण्याची आणखी एक पर्याय म्हणजे सिविल इंजिनीयर | जर तुमच्या आसपास किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये  असे इंजिनियर असतील की जे लोकांचे घरे बांधतात अशा इंजिनिअर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करणे गरजेचे आहे | कारण की त्यांना ही इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करण्याची असते | तुम्ही जर तुमच्या भागातील चार ते पाच इंजिनिअर धरून ठेवले तर तुम्हाला त्यांच्या साइटवर इलेक्ट्रिक हाउस वायरिंगचे  काम करण्यास भेटेल | आणि या प्रकारचा वापर करून आपण अनोळखी ग्राहक पण जोडू शकतो | अशाप्रकारे तुम्ही वेगवेगळे ग्राहक जोडून इलेक्ट्रिक हाऊस वायरिंगचे काम करू शकता | 

FAQs: 

1] इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग हे कोणीही करू शकतो का ?

उत्तर: नाही इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग हे काम फक्त इलेक्ट्रिक वायरमेनच करू शकतो |. 

2] इलेक्ट्रिक वायरमेन होण्यासाठी आपली कोणते शिक्षण होणे गरजेचे आहे ?

उत्तर : इलेक्ट्रिक वायरमेन होण्यासाठी तुम्हाला आय.टी.आय इलेक्ट्रिशन शिक्षण होने गरजेचे आह | 

3] इलेक्ट्रिक वायरमेन (I.T.I) कोर्स किती वर्षाचा असतो ?

उत्तर : इलेक्ट्रिक वायरमेन (I.T.I) कोर्स 2 वर्षाचा असतो |

तुम्हाला ही पोस्ट आवडू शकेल..

Electrical Contractor होऊन पैसे कसे कमवाईचे ?

निष्कर्ष:

मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट नक्कीच आवडले असेल | व इलेक्ट्रिक हाऊस वायरिंग करून पैसे कसे कमवायचे ? याच्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल | ही बिझनेस आयडिया तुम्हाला सांगण्या मागचे कारण म्हणजे | या बिजनेस मध्ये कोणत्याही प्रकारची कॉम्पिटिशन नाही | व हा बिजनेस खूप ट्रेनिंगला पण नाही त्यामुळे या बिझनेस मध्ये तुम्ही सक्सेसफुल होण्याचे चान्सेस खूप आहेत | म्हणून आम्ही तुमच्यापुढे हा बिजनेस सादर केला आहे | जर तुमचे मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक I.T.I करत असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना हा बिजनेस आयडिया सांगू शकता किंवा शेअर करू शकता | तुमच्या एका शेअरमुळे एका व्यक्तीचे भविष्य बदलू शकेल त्यामुळे हा ब्लॉग पोस्ट शेअर करण्यास विसरू नका |

धन्यवाद. 

जय हिंद, जय महाराष्ट्र |

Leave a comment